मुंबई : शिवसेनेमध्ये मंत्रिपदासाठी जोरदार लॉबिंग सुरु आहे. शिवसेनेच्या वाट्याला त्यांची 2 राज्यमंत्रीपदं आहे. या मंत्रीपदावर आपली वर्णी लागावी यासाठी शिवसेना आमदारांकडून जबरदस्त स्पर्धा सुरु आहे.
पहिल्या जागेकरता प्रताप पाटील चिखलीकर आणि अर्जुन खोतकर यांच्यामध्ये तीव्र चुरस आहे. तर दुस-या जागेसाठी अनिल परब आणि नीलम गो-हे यांच्यामध्ये कमालीची स्पर्धा आहे.
प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नावासाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आग्रही आहेत. मात्र आपलीही मंत्रीपदाकरता वर्णी लागावी याकरता इच्छुकांकडून जोरदार लॉबिंग सुरु आहे.
राज्यमंत्रिमंडळाच्या विस्ताराला मुहूर्त सापडला असला तरी शिवसेना शपथविधीत सहभाग घेणार की नाही हे याबाबत संभ्रम कायम आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तारात शिवसेना सहभागी होणार की नाही हे अजून निश्चित नसलं तरी मंत्रिपदासाठी मातोश्रीवर जोरदार लॉबिंग सुरू झालंय. मंत्रीमंडळाच्या विस्ताराबाबत खलबतंही मातोश्रीवर सुरू आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांशी मातोश्रीवर चर्चा करत आहेत. शिवसेना एक कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्रिपदांसाठी आग्रही आहे. शिवसेना आपल्याला हवं असलेलं पदरात पाडून घेणार की नाही? आणि शिवसेनेकडून कुणाची वर्णी लागणार याबाबत सध्या चर्चा सुरू आहे.