मुंबई : एक जूनपासून देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना मोठा धक्का देणार आहे. सर्व्हिसवर सर्व्हिस चार्ज अधिक वाढणार आहे.
एसबीआयने नुकतेच आपल्या गृहकर्ज घेणाऱ्या ग्राहकांना खुशखबर दिली आहे. पण सर्व्हिस चार्ज वाढवणार आहे.
१. बँकेच्या नव्या नियमानुसार आता कॅश विड्रॉल लिमिट केवळ ४ वेळा मोफत असणार आहे. त्यात तुमचे एटीएम ट्रान्सक्शनही सामील आहे.
२. ४ पेक्षा अधिक वेळा एसबीआयच्या शाखेतून कॅश ट्रान्सक्शन केले तर त्यानंतरच्या प्रत्येक ट्रान्सक्शनला ५० रुपये सर्व्हिस चार्ज द्यावा लागणार आहे.
३. तसेच ४ पेक्षा अधिक वेळा एसबीआयच्या एटीएममधून कॅश ट्रान्सक्शन केले तर ४ नंतरच्या प्रत्येक ट्रान्सक्शनला १० रुपये सर्व्हिस चार्ज द्यावा लागणार आहे.
४. तसेच तसेच ४ पेक्षा अधिक वेळा इतर बँकांच्या एटीएममधून कॅश ट्रान्सक्शन केले तर ४ नंतरच्या प्रत्येक ट्रान्सक्शनला २० रुपये सर्व्हिस चार्ज द्यावा लागणार आहे.
५. बँकेतून २० पेक्षा अधिक ५ हजार रुपयांपेक्षा जास्त फाटलेल्या नोटा बदल्यास २ ते ५ रुपये प्रत्येक नोटांवर चार्ज आणि सर्व्हिस टॅक्स द्यावा लागेल.
६. प्रत्येक नोटेवर २ रूपये आणि प्रत्येक १००० रुपयांवर ५ रुपये चार्ज किंवा यात जे जास्त होईल ते वसूल केले जाईल
७. ५००० रुपयांपर्यंतच्या फाटलेल्या नोटांवर प्रत्येक नोटेवर २ रुपये चार्ज आणि सर्व्हिस टॅक्स द्यावा लागले.
८. ५००० रुपयांवरच्या फाटलेल्या नोटांवर प्रत्येक नोटेवर ५ रुपये चार्ज आणि सर्व्हिस टॅक्स द्यावा लागले.
९. २० फाटलेल्या नोटा ज्यांची किंमत ५ हजारांपेक्षा कमी आहे, त्यांच्यावर कोणताही सर्व्हिस चार्ज लागणार नाही.
१०. एक जून पासून बँक रुपे डेबिट कार्ड मोफत देणार आहे. इतर कार्डांवर सर्व्हिस चार्ज लागणार आहे.
११. १ जून पासून बँक मास्टर आणि व्हिसा कार्ड इश्यू करायला सर्व्हिस चार्ज घेणार आहे