एसटीचा प्रवास पुन्हा महागला, केली अल्प भाडेवाढ

एसटीच्या प्रवास भाड्यात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे एसटीचा प्रवास थोडासा महागणार आहे. एसटीने ही अत्यल्प भाडेवाढ केल्याचे म्हटले आहे. ही भाडेवाढे ३१ जुलैपासून अमंलात येणार आहे.

Updated: Jul 26, 2014, 06:12 PM IST
एसटीचा प्रवास पुन्हा महागला, केली अल्प भाडेवाढ title=

मुंबई : एसटीच्या प्रवास भाड्यात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे एसटीचा प्रवास थोडासा महागणार आहे. एसटीने ही अत्यल्प भाडेवाढ केल्याचे म्हटले आहे. ही भाडेवाढे ३१ जुलैपासून अमंलात येणार आहे.

 

साध्या आणि जलद सेवेच्या पहिल्या ३० किमीच्या प्रवासासाठी ही भाडेवाढ लागू असणार नाही. ३१ ते १५० किमीसाठी १ रुपया वाढ करण्यात आली आहे. तर शहरी सेवेच्या पहिल्या १६ किमी प्रवासासाठी १ रुपया भाडेवाढ करणयात आली आहे. मात्र, त्यापुढील प्रवासासाठी ही भाडेवाढ नसल्याचे एसटीने म्हटले आहे.

ही भाडेवाढ सरासरी ०.८१ टक्के एवढी असून त्यामुळे साध्या आणि जलद, तसेच रात्रसेवेमध्ये प्रती सहा किमीसाठी ५ पैस तर निमआराम सेवेत प्रती सहा किमीसाठी १० पैसे अशी वाढ करण्यात आली आहे.

डिझेल दरात सतत होणाऱ्या दरवाढीमुळे राज्य परिवहन महामंडळास आपल्या प्रवासभाड्यात वाढ करणे भाग पडत असल्याचे एसटी प्रशासनाने म्हटले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.