‘आर्थर जेल’ची विशेष सुरक्षा काढणार

मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये मुंबई दहशतवादी हल्ल्यातील एकमेव जिवंत आरोपी अजमल कसाब याच्या देखरेखीसाठी तैनात केलेली ‘आयटीबीपी’च्या तुकडीनं अखेर मोकळा श्वास घेतलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 21, 2012, 01:32 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये मुंबई दहशतवादी हल्ल्यातील एकमेव जिवंत आरोपी अजमल कसाब याच्या देखरेखीसाठी तैनात केलेली ‘आयटीबीपी’च्या तुकडीनं अखेर मोकळा श्वास घेतलाय. लवकरच या टीमला लवकरच सीमेवर परत बोलावूलं जाण्याची शक्यता आहे.
प्रक्रियेनुसार, केंद्रीय बलाची एक विशेष तुकडी कसाबच्या सुरक्षेसाठी आर्थर रोड जेलमध्ये तैनात करण्यात आली होती. विशेष कार्य पूर्ण झाल्यानंतर या तुकडीला मुक्त करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून दलाच्या मुख्यालयाला आदेश दिले जातात.
सूत्रांच्या माहितीनुसार, कसाबला फाशीची शिक्षा दिल्यानंतर आता या तुकडीचं काम पूर्ण झालं आहे. त्यामुळे आता लवकरच या टीमला परत बोलावलं जाणार आहे. पाकिस्तानी दहशतवादी कसाब याला मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये आणल्यापासून ही तुकडी तैनात करण्यात आली होती. तेव्हापासून भारत-तिबेट सिमेवरील ३०० जवानांची एक तुकडी इथं तैनात करण्यात आली होती.