www.24taas.com, मुंबई
सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून भावना भडकवून मुंबईत ‘सीएसटी’वर हिंसाचार घडवण्यात आल्याची माहिती गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिलीय.
‘यू ट्यूब’ तसंच इतर सोशल नेटवर्किंग साईट्वर गुजरात दंगल तसच मॅनमारमधील भावना भडकावणाऱ्या व्हिडीओ क्लिप्स टाकण्यात आल्यात. या व्हिडीओ क्लिप्स बनावट असून घटना एका ठिकाणची आणि उल्लेख दुसऱ्या ठिकाणचा अशा पद्धतीनं भावना भडकावण्याचं काम सुरू असल्याचं आबांनी स्पष्ट केलंय. याप्रकरणी तज्ज्ञांमार्फत सत्यता पडताळण्याचं काम सुरू असल्याचंही आबांनी सांगितलंय.
दरम्यान, सीएसटीवर उसळेल्या हिंसाचाराला कारणीभूत ठरलेल्या सोशल नेटवर्कींग साईटवरच्या वादग्रस्त इमेजेस संदर्भात पोलिसांनी फेसबुकची मदत घेण्याचं ठरवलंय. त्यानुसार मुंबई पोलिसांनी वादग्रस्त इमेजेस ब्लॉक करण्याच्या सूचना फेसबुकला केल्या आहेत. तसंच ज्या आयपी अॅड्रेसवरून या वादग्रस्त इमेजेस अपलोड केल्या तो आयपी अॅड्रेस ट्रेस करण्यासही सांगण्यात आलंय. त्यासाठी तयार करण्यात आलेली ‘फेक अकाऊंट’ही शोधण्यास सांगण्यात आलंय. त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल असंही पोलिसांनी सांगितलंय. दरम्यान, पाकिस्तानातल्या आयपी अॅड्रेसवरुन या वादग्रस्त इमेजेस अपलोड करण्यात आल्या होत्या, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.