बहीण-भावाच्या नात्याला काळीमा, दोन सख्या बहीणींवर बलात्कार

वडाळ्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे . दोन सख्या भावांनी आपल्या सख्या दोघी बहिणींवर सातत्याने बलात्कार केला. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकाराला आईची फूस होती. पोलिसांनी दोघांसह आईला अटक केली आहे.

Updated: Apr 23, 2015, 09:16 PM IST
बहीण-भावाच्या नात्याला काळीमा, दोन सख्या बहीणींवर बलात्कार title=

मुंबई : वडाळ्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे . दोन सख्या भावांनी आपल्या सख्या दोघी बहिणींवर सातत्याने बलात्कार केला. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकाराला आईची फूस होती. पोलिसांनी दोघांसह आईला अटक केली आहे.

या घटनेमुळे वडाळा परिसरात संताप व्यक्त होत आहे. बहीण भावाचे नात हे अतूट असते . या पवित्र नात्याला दोघा भावांनी कलंक लावला आहे. या दोघा भावांनी गेल्या पाच वर्षांपासून  आपल्या  बहीणींवर सतत बलात्कार केला. या बहिणींवर या भावांनी जे केलं त्याला त्यांच्या आईची सुद्धा साथ होती, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

पाच वर्ष हा अत्याचार या बहिणी निमुटपणे सहन करत होत्या. हे नराधम भाऊ एवढ्यावरच नाही थांबलेत तर त्यांनी आपल्या दुसऱ्या  बहिणीवर सुध्दा गेल्या एक वर्षापासून बलात्कार करण्यास सुरुवात केली. दोघीही हा अत्याचार सहन करत होत्या. पण गेल्या काही दिवसांपासून मात्र हा त्रास जास्त झाल्याने त्यांनी आपल्या शेजाऱ्यांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर याबाबतची माहिती वडाळा पोलिसांना देण्यात आली. वडाळा ट्रक टर्मिनस पोलिसांनी या दोन भावांसह आईलाही अटक केली आहे .

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.