शुभा राऊळ यांनी नाकारला सेनेचा एबी फॉर्म

माजी महापौर शुभा राऊळ यांना नाकारला शिवसेनेचा एबी फॉर्म नाकारल्याचं समजतंय... तर दुसरीकडे तेजस्विनी घोसाळकर यांना उमेदवारी देण्यात आलीय.

Updated: Feb 2, 2017, 11:25 AM IST
शुभा राऊळ यांनी नाकारला सेनेचा एबी फॉर्म  title=

मुंबई : माजी महापौर शुभा राऊळ यांना नाकारला शिवसेनेचा एबी फॉर्म नाकारल्याचं समजतंय... तर दुसरीकडे तेजस्विनी घोसाळकर यांना उमेदवारी देण्यात आलीय.

घोसाळकर विरुद्ध राऊळ

यामागचं खरं कारण विनोद घोसळकर आणि त्यांच्या मुलाशी झालेल्या वादाचाचं असल्याचं बोलल जातंय. सेनेकडून तेजस्विनी घोसाळकर यांना प्रभाग क्रमांक 1 मधून एबी फॉर्म देण्यात आलाय. उदया 12.30 वाजता त्या आपला अर्ज निवडणुकीसाठी दाखल करणार आहेत. तेजस्विनी या अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी आहेत. 

शिवसेनेचे आमदार विनोद घोसाळकर यांचा मुलगा अभिषेक घोसाळकर आणि शुभा राऊळ यांच्यातील वाद हा काही मुंबई महापालिकेला नवीन नाही. काही दिवसांपूर्वी सेनेच्या शीतल म्हात्रे आणि शुभा राऊळ यांच्याविरोधात आचारसंहिता भंग केल्याची तक्रार अभिषेक घोसाळकरांनी केली होती. त्यानंतर घोसाळकरांना पक्षांतून काढण्यात आलं. पण लगेचचं त्यांना परतही घेण्यात आलं. मुंबई महापालिकेचा वॉर्ड क्रमांक 1 आणि वॉर्ड क्रमांक 8 मधल्या उमेदवारीवरून हा सगळा राजकीय ड्रामा रंगल्याचीही यावेळी चर्चा होती.

राऊळ यांचं स्पष्टीकरण

या प्रकरणानंतर नाराज झालेल्या राऊळ यांनी तिकीट नाकारल्याची चर्चा आहे. परंतु, आपल्याला निवडणूक लढवण्याची इच्छा नाही... आपण तीन महिने अगोदरच हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना स्पष्टपणे सांगितलं होतं. त्यामुळे त्यांनी इतर इच्छुक उमेदवारांना संधी दिली, असं स्पष्टीकरण शुभा राऊळ यांनी दिलंय. 

महापौर स्नेहल आंबेकर यांना नको असलेल्या १९५ वॉर्डमधून उमेदवारी देण्यात आले आहे. सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव, नगरसेविका किशोरी पेडणेकर, शितल म्हात्रे विभाग प्रमुख आशिष चेंबूरकर, मंगेश सातमकर यांना एबी फॉर्म दिले गेलेत.