"दुकानदारांनाही मराठी आलंच पाहिजे" - विनोद तावडे

मनसेनंतर भाजपनेही पुन्हा मराठी अजेंडावर जोर देण्यास सुरूवात केल्याचं दिसतंय, महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन अशी वक्तव्य केली जात नाहीत ना?, असा सवाल उपस्थित केला जात आहे. कारण,  "महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी आलेच पाहिजे", असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज येथे केले. 

Updated: Jan 13, 2015, 08:33 AM IST
"दुकानदारांनाही मराठी आलंच पाहिजे" - विनोद तावडे title=

मुंबई : मनसेनंतर भाजपनेही पुन्हा मराठी अजेंडावर जोर देण्यास सुरूवात केल्याचं दिसतंय, महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन अशी वक्तव्य केली जात नाहीत ना?, असा सवाल उपस्थित केला जात आहे. कारण,  "महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी आलेच पाहिजे", असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज येथे केले. 

मराठी विश्‍वकोश खंड २०च्या पूर्वार्धाचे प्रकाशन लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते झाले. या वेळी विनोद तावडे उपस्ठित होते, तेव्हा ते बोलत होते.

महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी आलेच पाहिजे. दुकानाच्या पाट्या फक्‍त मराठीत असून चालत नाहीत तर त्या दुकानातील माणसालाही मराठी आलेच पाहिजे, असं विनोद तावडे यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्याकडे  मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची मागणी. मराठी भाषा जगाच्या कानाकोपऱ्यात पोचली पाहिजे, असा आशावाद सूमित्रा महाजन यांनी शेवटी व्यक्‍त केला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.