अनधिकृत झोपडपट्टीनं घेतला सहा अल्पवयीन मुलांचा बळी

मुंबईतल्या वांद्रेतील बेहरामपाड्यात चार मजली इमारत कोसळून चार जणांचा मृत्यू झाला आहे तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

Updated: Oct 13, 2016, 07:49 PM IST
अनधिकृत झोपडपट्टीनं घेतला सहा अल्पवयीन मुलांचा बळी title=

मुंबई : मुंबईतल्या वांद्रेतील बेहरामपाड्यात चार मजली इमारत कोसळून चार जणांचा मृत्यू झाला आहे तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. एक जण अजूनही ढिगा-याखाली अडकलेला असून त्याला बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

या दुर्घटनेत मृत पावलेले सर्व जण अल्पवयीन आहेत. यामध्ये 12 वर्षांची आयेशा अकबर, साडेतीन वर्षांचा मुलगा अली निसार अहमद खान, 14 वर्षांचा ओसामा निसार खान, आणि एक वर्षांची अफिफा सादाब यांचा मृत्यू झाला आहे.

दुर्घटनेतील चार गंभीर जखमींना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे, तर एक जण ढिगा-याखाली अडकल्याचं कळतयं. त्याला बाहेर काढण्यासाठी अग्नीशमन दलाच्या जवानांचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.   एनडीआरएफची टीमही मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाली आहे.