मुंबई : विलास शिंदे यांच्या दुर्दैवी मृत्युनंतर कायदा सुव्यवस्थे वरुन शिवसेनेचा भाजपवर निशाणा साधला आहे. 'गृहखाते हे स्वतंत्र व्यक्तीकडे असावे. गृहखाते शिवसेनेकडे आहे या जाणिवेनेच गुंडांना दहशत बसेल' असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
'गुंडाना जरब बसवण्यासाठी फ़क्त कागदावरचा कायदा किंवा मंत्रालयातली खुर्ची उपयोगाची नाही. त्या खुर्चीवर कोण बसले आहे हे सुद्धा महत्वाचे आहे.
शिवसेनेकडे गृहखाते असते तर वेगळ्या मार्गाने या गुंडांचा बंदोबस्त आम्हाला करता आला असता. पोलिसांवर हल्ल्याची प्रकरणे वाढली आहेत. मुख्यमंत्री सक्षम आहेत, त्यांचा आदर करतो. पण गृह खात्यावर 24 तास काम करणारी व्यक्ती हवी असं देखील राऊत यांनी म्हटलं आहे.
पोलिसांवर होणारे हल्ले महाराष्ट्राला शोभणारे नाहीत. त्यांचे मनोधैर्य खच्ची होतेय. ते आणखी खच्ची होईल त्या दिवशी गुंड, अतिरेक्यांची ताकद वाढेल. असं देखील त्यांनी म्हटलं आहे.