मनसे नंतर सेनेचाही, आशाताईंना विरोध

पाकिस्तानी कलाकारांचा सहभाग असलेल्या सूरक्षेत्र या कार्यक्रमाला मनसेनंतर आता शिवसेनेनंही विरोध केला आहे.

Updated: Aug 31, 2012, 01:51 PM IST

पाकिस्तानी कलाकारांचा सहभाग असलेल्या सूरक्षेत्र या कार्यक्रमाला मनसेनंतर आता शिवसेनेनंही विरोध केला आहे. पाकिस्तानी कलाकारांच्या विरोधाची भूमिका शिवसेनेकडून कायम आहे.
या कार्यक्रमालाही शिवसेनेचा विरोध राहणार असल्याचं शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आशाताईंनीही या कार्यक्रमात सहभागी होऊ नये असं आवाहन शिवसेनेकडून करण्यात आलं आहे.
पाकिस्तानी गायक आणि स्पर्धकांचा सहभाग असलेल्या सूरक्षेत्रला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध केला होता. तसेच या कार्यक्रमात ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी परिक्षक म्हणून सहभागी होऊ नये, अशी विनंती मनसेतर्फे करण्यात आली होती. मात्र हा इशारा ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी धुडकावून लावला होता.