मांसविक्री करणारे सेना-मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

पर्युषण काळात उघड्यावर मांसविक्री करणाऱ्या मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

Updated: Sep 10, 2015, 12:34 PM IST
मांसविक्री करणारे सेना-मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात title=

मुंबई : पर्युषण काळात उघड्यावर मांसविक्री करणाऱ्या मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

आजपासून जैन धर्मियांचा पर्युषण पर्व सुरू होतंय. त्यामुळे मुंबईतले कत्तलखाने चार दिवस बंद ठेवण्यात येतंय. शिवाय चार दिवस मुंबईत मांसविक्रीही बंद ठेवण्यात आलीय. या निर्णयाला मनसेचा तीव्र विरोध आहे.

अधिक वाचा - मांस विक्री बंदी घालू देणार नाही : उद्धव

पर्युषणाच्या काळात उघड्यावर मांसविक्री करून या निर्णयचा निषेध करण्यासाठी मनसेचे गटनेते संदीप देशपांडे दादरच्या मंडईबाहेर पोहचले. त्यांच्या बाजूलाच शिवसेनेनंही आपलं आंदोलन केलं.

अधिक वाचा - बकरी ईददरम्यान भाजी विक्रीवर बंदी घालणार का, ओवेसींचा सवाल

कार्यकर्त्यांच्या या आंदोलनाविरोधात पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केल्यावर तिथे जोरात बाचाबाची झाली. त्यानंतर सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलाय.

अधिक वाचा - #meatban वर भडकले TWITTER यूजर्स, मुंबईला म्हटलं Ban-istan

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.