मुंबई: विधीमंडळाच्या या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यासह सत्ताधाऱ्यांमध्येही अंतर्गत सामना रंगण्याची चिन्ह आहेत. कारण अधिवेशनात सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेणार असल्याचे संकेत शिवसेनेनं दिले आहेत.
सभागृहात जनतेचे प्रश्न मांडा असा आदेशच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेना आमदारांना दिलाय. आज झालेल्या शिवसेनेच्या बैठकीत आमदारांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका मांडली. दुष्काळग्रस्त आणि अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदील झालाय. शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही.
त्यामुळं कुठल्या तोंडाने सरकारमधील आमदार म्हणून जनतेसमोर जायचं, असा सवाल शिवसेना आमदारांनी उद्धव ठाकरेंना केला. त्यामुळं याचे पडघम अधिवेशनातही उमटणार असल्याचं आतापासूनच दिसतंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.