शेवटच्या सभेवरूनही शिवसेना-भाजपमध्ये सामना

बीकेसी ग्राऊंडवर शेवटची सभा कोण घेणार यावरूनही शिवसेना-भाजपमध्ये वाद सुरु झाला आहे.

Updated: Feb 11, 2017, 06:47 PM IST
शेवटच्या सभेवरूनही शिवसेना-भाजपमध्ये सामना title=

मुंबई : बीकेसी ग्राऊंडवर शेवटची सभा कोण घेणार यावरूनही शिवसेना-भाजपमध्ये वाद सुरु झाला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शेवटची प्रचारसभा 18 फेब्रुवारीला होणार आहे. या सभेच्या परवानगीसाठी शिवसेनेनं एमएमआरडीएला 12 जानेवारीला पत्र लिहीलं आहे, पण बीकेसीच्या मैदानावर भाजपला सभेसाठी परवानगी मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांकडून दबाव टाकण्यात येत आहे, असा आरोप शिवसेना आमदार अनिल परब यांनी केला आहे.

बीकेसी मैदानामध्ये शिवसेनेला परवानगी मिळाली नाही तर आम्ही भाजपविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करू, असा इशारा अनिल परब यांनी दिला आहे. काहीही झालं तरी शिवसेनेची शेवटची प्रचारसभा बीकेसी मैदानातच होणार असंही परब म्हणालेत.