महाराष्ट्रात आल्यावर दबंग शिवदीप लांडेंची पहिली कारवाई

बिहारचे दंबग आयपीएस शिवदीप लांडे यांची मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथक पोलीस उपायुक्त म्हणुन नियुक्ती करण्यात आल्यानंतर त्यांनी पहिलीच कारवाई केली आहे. 

Updated: Feb 11, 2017, 06:14 PM IST
महाराष्ट्रात आल्यावर दबंग शिवदीप लांडेंची पहिली कारवाई  title=

मुंबई : बिहारचे दंबग आयपीएस शिवदीप लांडे यांची मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथक पोलीस उपायुक्त म्हणुन नियुक्ती करण्यात आल्यानंतर त्यांनी पहिलीच कारवाई केली आहे.

मुंबईच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं एक किलोचं एमडी ड्रग्ज जप्त केलं आहे. या प्रकरणामध्ये अटक झालेला आरोपी सुनिल भगवानदास घुतिया हा एनसीपीचा पदाधिकारी आहे. सुनिल हा एनसीपीच्या दक्षिण मुंबईचा कोषाध्यक्ष आहे. सुनिलबरोबरच पोलिसांनी त्याचा साथीदार विक्की नाडरलासुद्धा अटक केली आहे.

बिहारमध्ये त्यांनी आपल्या कर्तव्यदक्षतेची छाप सोडली होती. महाराष्ट्रातही आयपीएस शिवदीप लांडे जीवाचं रान करून कार्य करतील अशी अपेक्षा सर्वसामान्यांना आहे. शिवदीप लांडे हे महाराष्ट्रात तीन वर्षासाठी आहेत. शिवदीप लांडे यांनी बिहारमधील अतिशय धोकादायक समजल्या जाणाऱ्या भागातही सर्व प्रकारच्या माफियांना सळो की पळो करून सोडले होते.

शिवदीप लांडे हे मराठी असले तरी त्यांच्या कार्यामुळे ते बिहारमध्ये सर्व सामान्यांमध्ये लोकप्रिय झाले आहेत. एकदा त्यांना बदलीच्या ठिकाणी निरोप देत असताना रस्त्याच्या बाजूला 3 किमी पर्यंतची रांग लागली होती.