सेल्फी पॉईंटची परवानगी रद्द, राजकीय नेत्यांना आयुक्तांचा दणका

 शिवाजी पार्कवरील सेल्फी पाँईटची परवानगी अखेर रद्द करण्यात आलीय. दिलेली परवानगी आयुक्तांनी रद्द केलीय. नागरिकांनी या सेल्फी पाँईटला विरोध केला होता.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 5, 2017, 12:08 AM IST
सेल्फी पॉईंटची परवानगी रद्द, राजकीय नेत्यांना आयुक्तांचा दणका title=

मुंबई : शिवाजी पार्कवरील सेल्फी पाँईटची परवानगी अखेर रद्द करण्यात आलीय. दिलेली परवानगी आयुक्तांनी रद्द केलीय. नागरिकांनी या सेल्फी पाँईटला विरोध केला होता.

नागरिकांच्या तक्रारीची आयुक्तांनी गंभीर दखल घेत हि परवानगी नाकारली. मनसे, शिवसेना, भाजप या तिन्ही पक्षांची परवानगी रद्द करण्यात आलीय. दरम्यान मनसे, भाजप आणि शिवसेनेने याबाबत सामंजस्यची भूमिका घेतल्याने यापूर्वी परवानगी देण्यात आली होती.

जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त रमाकांत बिरादार यांच्या पुढाकाराने हा निर्णय घेण्यात आला होता..त्यात सेल्फी पॉइंटची मूळ जागा मनसेकडेच कायम राहणार होती. तर त्याच्या काही अंतरावर भाजपचा सेल्फी पॉईंट आणि, स्काऊट पॅव्हेलियनच्या बाहेर शिवसेनेचा सेल्फी पॉईंट असणार होता. 

सेल्फी पॉइंटमुळे शिवाजी पार्कमध्ये सकाळी चालणारे आणि संध्याकाळी चालणाऱ्यांना अडथळा निर्माण होत असल्याने त्याला खुद्द शिवाजी पार्कवासीयांनीच या संकल्पनेला विरोध दर्शविला. तशी तक्रार त्यांनी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे केली. 

या तक्रारीची आयुक्तांनीही तितकीच गंभीर दखल घेत शिवाजी पार्कमध्ये कुठल्याही सेल्फी पॉईंटला परवानगी देण्यात येऊ नये तसेच याआधी राजकीय पक्षांना सेल्फी पॉईंटसाठी दिलेली परवानगी रद्द करण्याचे आदेश जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त रमाकांत बिरादार यांना दिले. बिरादार यांनीही तसे राजकीय पक्षांना तातडीने लेखी कळविले आहे.

त्यामुळे आता शिवाजी पार्क मध्ये मनसे, भाजप आणि शिवसेना यापैकी कुणाचाही सेल्फी पॉईंट यापुढे असणार नाहीये. तर यानिमित्तानं शिवाजी पार्क वासीयांनी सुटकेचा श्वास सोडलाय. मनसे, भाजप आणि शिवसेनेत सेल्फी पॉईंट वरून स्पर्धा निर्माण झाली होती. सहायक आयुक्तांनी काल तीन्ही पक्षांना समान अंतरावर परवानगी देत वादावर तोडगा काढला होता. पण महापालिका आयुक्तांच्या निर्णयामुळे सेल्फी पॉइंट आता होणार नाही.