मुंबई : चौथीच्या अभ्यासक्रमातील इतिहासाच्या पुस्तकात शिवाजी महाराज यांच्यावरचे ४ धडे वगळण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे.
आमदार राणे यांनी विधानसभेत आज हा मुद्दा उचलून धरला. तर कोणताही धडा बदललेला नसल्याचा दावा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला आहे.
शिवाजी महाराजांचं शौर्य तसेच ठेवलेय आणि त्यांची पर्यावरणनीती कशी होती यासह अन्य बाबी वाढवण्यात आल्याचे तावडे म्हणाले. शिवाजी महाराजांचा जो मूळ फोटो होता तो बदलण्यात आला असून दुसरा फोटो त्याऐवजी वापरण्यात आलाय. शिवाजी महाराज यांच्या प्रश्नावरुन विधानसभेत जुगलबंदी पाहायला मिळाली.