मुंबई : भाजपकडून डावलले जात आहे, अशी कबुली शिवसेना मंत्र्यांनी दिली. शिवसेनेच्या आमदार मतदारसंघातील विकास कामांना निधी कमी मिळत आहे. हा निधी भाजपच्या लोकप्रतींधींना तुलनेने जास्त निधी मिळतो याबाबत नाराजी होती. याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यात आली. तसेच शेतकरी कर्जमुक्तीवर विचार करण्यात आला. त्यानुसार उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सेना मंत्री चर्चा करणार आहेत.
शिवसेना पक्षाची नव्याने बांधणी करणार आहे. यात प्रामुख्याने ग्रामीण भागावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. तसेच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणी करण्यातबाबत आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली, अशी माहिती पर्यावरण मंत्री आणि सेना नेते रामदास कदम यांनी दिली.
- ग्रामीण भागात नव्याने पक्ष बांधणी, केंद्रातली भूमिका, आमदारांच्या मतदारसंघातील कामं आणि पुढच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी याबाबत आजच्या बैठकीत चर्चा.
- कर्जमुक्तीवर शिवसेनेची भूमिका ठाम आहे.
- लवकरच आमदारांची कामं आणि कर्जमुक्तीसाठी उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील. शिवसेनेचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार.
- भाजपकडून डावललं जातंय ही गोष्ट खरी. यावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार
- संघटनात्मक बाबी, शेतकरी कर्जमुक्ती आणि आमदारांच्या मतदारसंघातील विकासकामांचा आढावा घेण्यात आला.
- उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा सुरु आहे.
- मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच्या बैठकीत आमदारांच्या कामांची यादी मागितली होती
- भाजपच्या लोकप्रतींधींना तुलनेने जास्त निधी मिळतो याबाबत नाराजी होती.
- याबाबत उद्या सकाळी 10 वाजता शिवसेनेचे सर्व मंत्री मुख्यमंत्र्यांची वर्षावर भेट घेणार आहेत