शिवसेना विरोधात बसणार, अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार

शिवसेना विरोधी पक्षात बसणार असल्याचं शिवसेना नेते रामदास कदम यांनी स्पष्ट केलं आहे. शिवसेनेची भाजपसोबतची शेवटची चर्चाही निष्फळ ठरली आहे. 

Updated: Nov 12, 2014, 09:10 AM IST
शिवसेना विरोधात बसणार, अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार title=

मुंबई : शिवसेना विरोधी पक्षात बसणार असल्याचं शिवसेना नेते रामदास कदम यांनी स्पष्ट केलं आहे. शिवसेनेची भाजपसोबतची शेवटची चर्चाही निष्फळ ठरली आहे. 

आधी तुम्ही मतदान करा, आणि मग मंत्रिपदांचा निर्णय घेऊ, असं उत्तर भाजपकडून कायम असल्याने अखेर शिवसेनेने विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतला आहे.

आमचा आता भाजपवर विश्वास राहिलेला नसल्याचंही रामदास कदम यांनी स्पष्ट केलं आहे. यामुळे आता स्पष्ट झालं आहे की, शिवसेना विरोधात बसणार आहे. 

देवेंद्र फडणवीस यांना आज विधिमंडळात बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. विश्वासदर्शक ठरावात शिवसेना भाजप विरोधात मतदान करेल हे देखिल स्पष्ट झालं आहे. तर दुसरीकडे विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यावर देखिल शिवसेना ठाम आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.