'त्या' पोस्टरमुळे शिवसेनेची अडचण वाढली, काँग्रेसची तक्रार

शिवसेना कार्यकर्त्यांनी मुंबईत काही ठिकांणी लावलेल्या वादग्रस्त पोस्टरमुळे शिवसेना अडचणीत येण्याची शक्यता आहे. या पोस्टरवर काँग्रेसने आक्षेप घेतलाय.

Updated: Oct 22, 2015, 01:57 PM IST
'त्या' पोस्टरमुळे शिवसेनेची अडचण वाढली, काँग्रेसची तक्रार title=

मुंबई : शिवसेना कार्यकर्त्यांनी मुंबईत काही ठिकांणी लावलेल्या वादग्रस्त पोस्टरमुळे शिवसेना अडचणीत येण्याची शक्यता आहे. या पोस्टरवर काँग्रेसने आक्षेप घेतलाय.

शिवसेनेच्या 'त्या' पोस्टरविरोधात काँग्रेसने तक्रार केली आहे. राजकीय पोस्टरवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे छायाचित्र छापण्याबद्दल काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. त्यामुळे शिवसेनेची अडचण वाढली आहे.

अधिक वाचा : बाळासाहेबांसमोर मान झुकवणाऱ्या मोदींचे वादग्रस्त पोस्टर हटविले

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या समोर हात जोडल्यांचे फोटो होते. या पोस्टरमध्ये माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी, गोपीनाथ मुंडे, नरेंद्र मोदी यांच्यापासून ते शरद पवार, राज ठाकरे, नारायण राणे यांनी बाळासाहेबांच्या घेतलेल्या भेटीचे फोटो लावण्यात आले होते.

दरम्यान, शिवसेना भवनसमोरील हे पोस्टर अधिकृत नाही, शिवसेनेची ती भूमिका नाही. कार्यकर्त्यांनी रागाच्या भरात ते पोस्टर लावले असेल, यावर कृपया आणखी चर्चा करू नये, स्पष्टीकरण प्रसिद्धीप्रमुख हर्षल प्रधान यांनी केलेय. पोस्टरवरून रंगलेल्या वादानंतर शिवसेनेने स्पष्टीकरण केलेय. दरम्यान, हे पोस्टर काढण्यात आलेय.

अधिक वाचा : पाकिस्तानातील मराठी कुटुंबाचा शिवसेनेला सवाल

आज 'सामना'तून शिवसेने भूमिका स्पष्ट केलेय. पाकिस्तानच्या हल्ल्यामुळे निरपराध्यांच्या रक्ताने या देशाची माती लालेलाल होत असतानाही सहिष्णुतेची जपमाळ ओढत बसायचे, ही नामर्दानगी शिवसेनेच्या रक्तात नाही. हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुत्वासाठी देशाच्या दुश्मनांशी दोन हात करणारे शिवसेनाप्रमुख यांच्या महाराष्ट्राला कोणीही सहिष्णुता शिकवू नये असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी लगावला आहे. 

पाकिस्तानच्या मुद्यावरून गेल्या काही दिवसांपासून आक्रमक बनलेल्या शिवसेनेवर चहूबाजूंनी टीका होत असून दोन दिवसांपूर्वीच केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटलींनीही शिवसेनेला इशारा देत चर्चा व वादविवादाच्या ‘सभ्य मार्गा’ने विरोध व्यक्त करण्याचा सल्ला दिला होता. 

अधिक वाचा : शिवसेनेचे कान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने टोचले

यानंतर 'सामना'च्या अग्रलेखातून उद्धव यांनी टीकाकारांचा समाचार घेतला.  शिवसेनेने पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांचा कार्यक्रम होऊ दिला नाही. पाकिस्तानचा माजी विदेशमंत्री कसुरी याच्यासाठी पायघड्या घालणार्‍यांचे तोंड काळे केले. पाकड्या क्रिकेटपटूंना आग्रहाचे, प्रेमाचे निमंत्रण देणार्‍या क्रिकेट बोर्डाच्या कार्यालयात घुसून धिक्कार केला. यामुळे देशाची सहिष्णुता वगैरे धोक्यात आली व राज्य किंवा देशाची बदनामी झाली असे कुणाला वाटत असले तरी आम्हाला या बोटचेप्या मतांची पर्वा करण्याचे कारण नाही. तोंडात एक व पोटात दुसरे हा आमचा धर्म नाही, असे म्हटलेय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.