मुंबई : मुंबई महानगरपालिका मुख्यालयात महापौर स्नेहल आंबेरकर यांना धक्काबुक्कीचा प्रयत्न झालाय.
काँग्रेस नगरसेविका शीतल म्हात्रे यांच्याकडून महापौरांना धक्काबुक्कीचा प्रयत्न केला गेला. अर्थसंकल्प प्रस्ताव मंजुरीवरुन काँग्रेस नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी महापौर स्नेहल आंबेरकरांना लक्ष्य केलं.
तीन दिवसांपासून महापालिकेत अर्थसंकल्पावर चर्चा सुरु होती. मात्र, मतदान न घेताच अर्थसंकल्प मंजुरीचा प्रस्ताव मंजूर केला गेला. त्यामुळे संतापलेल्या काँग्रेस नगरसेविका शितल म्हात्रे आक्रमक झाल्या.
अर्थसंकल्पाचा प्रस्ताव स्थायी समितीकडे पाठवा अशी उपसूचना शीतल म्हात्रे यांनी तीन वेळा केली होती. महापालिका नियमानुसार तीनदा उपसूचना मागितल्यानंतर मतदान घेणं आवश्यक असतं. मात्र, या नियमाचं उल्लंघन केलं गेल्यामुळे, शीतल म्हात्रे यांनी महापौरांना अडवण्याचा प्रयत्न केला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.