मुंबई : हायप्रोफाइल शीना बोरा मर्डर केसमध्ये दररोज नवनवीन आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. नव्या धक्कादायक खुलाशानुसार इंद्राणी बोरा आणि तिचे वडील उपेंद्रकुमार बोरा यांच्यात शारीरिक संबंध होते आणि त्यातूनच शीना बोराचा जन्म झाला होता. त्यामुळे शीना ही इंद्राणी मुखर्जीची बहिण आणि मुलगी दोन्ही होती.
अधिक वाचा : Exclusive : शीना बोराचा मृतदेह या ठिकाणी गाडण्यात आला. फोटो पाहा
शीना मर्डर केसची व्याप्ती जसजशी वाढत आहे, तस-तसे नवे खुलासे होत आहेत. आतापर्यंतच्या चौकशीत फिजिकल रिलेशन याने खूप महत्वाची भूमिका निभावली आहे.
रिलेशनशिपसंबंधी इंद्राणीचा खुलासा
कॅचन्यूज डॉट कॉमला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जुन्या संबंधाबाबत चौकशी करण्यात आली तेव्हा इंद्राणी कोलमडली आणि तिने जे खुलासे केले ते ऐकल्यावर पोलिसांनाही विश्वास बसत नव्हता. इंद्राणीने पोलीसांना सांगितले की पीटर मुखर्जी यांच्याशी लग्न करण्यापूर्वी सिद्धार्थ दास आणि संजीव खन्ना यांच्याशी संबंध होते.
पतीपासून नाही पित्यापासून जन्मली शीना
इंद्राणीने चौकशीत सांगितले की लहानपणी तिचे वडील उपेंद्र बोरा तिच्याशी जबरदस्ती करत होते. मग तिने सांगितले की, जेव्हा मी १७ वर्षांची होती तेव्हा तीने शीनाला जन्म दिला. शीना ही तिच्याच वडिलांकडून झालेल्या शरीर संबंधातून झाली आहे. इंद्राणीच्या या खुलाशानंतर चौकशी करणाऱ्या पोलिसांनना शीनाचा भाऊ मिखाइल बोराच्या पितृत्वावरूनही करण्यात आलेल्या दाव्यावर संशय निर्माण होत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.