मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी छगन भुजबळ यांच्यावरील कारवाईबाबत अखेर मौन सोडलं आहे. सरकार आम्हाला कधी जेलमध्ये टाकतंय, याची आम्ही वाट पाहतोय, अशी तिखट प्रतिक्रिया शरद पवारांनी व्यक्त केली आहे.
एवढंच नाही तर कारवाईच्या बातम्या कशा लिक होतात, असा सवालही शरद पवारांनी केला आहे. यावरून शरद पवार अखेर छगन भुजबळ यांच्या मदतीला धावून आले आहेत हे स्पष्ट होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे अखेर छगन भुजबळांसाठी धावून आलेत... विविध घोटाळ्यांमध्ये अडकलेल्या भुजबळांच्या मालमत्तेवर एसीबीनं छापे घातल्यानंतर, राष्ट्रवादीनंही त्यांना वा-यावर सोडलं होतं. त्यामुळं भुजबळ काहीसे एकाकी पडले होते. मात्र, आज सकाळीच छगन भुजबळ यांनी महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी आपल्यावर आकसाने कारवाई केल्याची कैफियत पवारांकडे मांडली होती. त्यानंतर प्रथमच पवारांनी त्यांची पाठराखण केलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.