मुंबई : मुंबई शहरात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. सकाळपासून पावसाला जोर आला. या जोरदार पावसामुळे दादर आणि हिंदमाता परिसरात पाणी भरले. त्यामुळे वाहतुकीची कोंडी पाहायला मिळाली. तर दुपारी १.२० वाजता हायटाईड येणार असल्याने समुद्रावर कोणीही जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईत जोरदार पाऊस कोसळत आहे. सायन, कुर्ला, बोरिवली, सांताक्रुझ या ठिकाणी चांगला पाऊस झालाय. तर मुंबई उपनगरातही पावसाचा चांगला जोर आहे. ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवलीत पाऊस आहे.
ठाणे, मुलुंड, पवईमध्येही मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. पश्चिम उपनगरांतही संततधार पाऊस सुरू आहे. दादर वरळी परळ भागातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबई उपनगरात पहाटेपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. मुंबईत पावसामुळे अनेक भागात वाहतुकीची कोंडी झाली आहे.
समुद्रात आज दुपारी १.२० वाजता हायटाईट येणार असल्याने ४.६६ मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. त्यामुळे समुद्रात कोणी जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.