मुंबई : अंधेरीत लोटस पार्कची आग विझवणारे शहीद जवान नितीन इवलेकर यांच्यावर आज विरारमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान आज सकाळी भाय़खळ्याच्या मुख्यालयात त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आलं.
अग्निशमन दलाच्या हलगर्जीपणामुळेच इवलेकरांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या पत्नीनं केला. नितीन बोरिवली फायर स्टेशनमध्ये कार्यरत होते. इवलेक यांच्या पश्चात पत्नी, तीन वर्षांची मुलगी आणि एक सहा महिन्यांची मुलगी असा परिवार आहे.
नितीन यांच्या पश्चात त्यांच्या मुलांच्या भविष्याचं काय होणार अशी चिंता आता त्यांच्या कुटुंबाला भेडसावतीये. 2005 साली वडिलांच्या जागी ते फायर ब्रिगडेमध्ये भरती झाले. 2010 पासून बोरिवली फायर स्टेशनला ते कार्यरत होते. चार महिन्यांपूर्वीच ते विरारला नव्या घरात कुटुंबासह राहायला गेले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.