www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिक आणि वृद्धांनो सावधान...सध्या वृद्धांना गंडा घालणारी एक टोळी मुंबईत सक्रिय झालीय. असंच एक धक्कादायक फुटेज आमच्या हाती लागलंय.
नागपाड्यातल्या युनियन बँकेमध्ये कॅश काऊंटरवर एक वृद्ध महिला पैसे जमा करत होती.... जवळ असलेल्या कॅशला लावलेली स्टॅपलरची पीन निघत नव्हती, त्यामुळे तिनं एका तरुणाला बंडलची पिन काढायला सांगितली. त्यानं पैशांच्या बंडलची पीन काढली. पण हातचलाखी करत त्या महिलेचे तब्बल 37 हजार रुपये चोरुन तो पसार झाल्याचे पोलीस निरीक्षक आर. के. रमाने यांनी सांगितले.
"पुढे जाऊ नका, अंगावरचं सोनं काढून ठेवा, असं सांगून काही वृद्धांना लुटलं जातंय.... तर कधी "बँकेत पैसे मोजून देतो, म्हणून वृद्धांची लुट केली जाते. अशा पद्धतीनं फक्त वृद्धांना टार्गेट करणा-या काही टोळ्या मुंबईत सक्रिय झाल्यायत. त्यामुळे वृद्धांनी शक्यतो एकटं दुकटं जाऊ नये किंवा पुरेशी सावधानता बाळगावी, असं आवाहन पोलिसांनी केलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.