सेना-भाजप युती धोक्यात, शिवसेनेचा प्रस्ताव भाजपने धुडकावला

 भाजपसह मित्रपक्षाला शिवसेनेने ११९ जागांचा प्रस्ताव दिला. मात्र, हा प्रस्ताव भाजपला मान्य नाही. हा प्रस्ताव भाजपने धुकावून लावला. त्यामुळे अनेक वर्षांची युती तुटण्याची दाट शक्यता आहे.

Updated: Sep 18, 2014, 11:19 PM IST
सेना-भाजप युती धोक्यात, शिवसेनेचा प्रस्ताव भाजपने धुडकावला title=

मुंबई :  भाजपसह मित्रपक्षाला शिवसेनेने ११९ जागांचा प्रस्ताव दिला. मात्र, हा प्रस्ताव भाजपला मान्य नाही. हा प्रस्ताव भाजपने धुकावून लावला. त्यामुळे अनेक वर्षांची युती तुटण्याची दाट शक्यता आहे.

१६९ जागा शिवसेनेने स्वत:साठी घेत त्यातील ९ जागा मित्र पक्षांना सोडण्याची तयारी दाखविली आहे. तर ११९ जागा पैकी ९ जागा भाजपने घटक पक्षांना सोडाव्यात, असे शिवसेनेने म्हटले आहे. त्यामुळे हा फॉर्म्युला भाजपला मान्य नाही.

शिवसेना आणि भाजपने मित्र पक्षांना एकूण १८ जागा सोडण्याची तयारी दर्शविली आहे. या जागांवर मित्रपक्ष सहजासहजी राजी होतील, अशी शक्यता आहे. मित्र पक्षांना दोन आकडी जागा असल्याने महायुतीबाबत आता प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे महायुती तुटण्याची शक्यता आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.