अंगारकीनिमित्त सिद्धिविनायकाच्या मंदिरात सुरक्षेत वाढ

उद्या अंगारकीनिमित्त तुम्ही मुंबईतल्या सिद्धिविनायकाच्या दर्शनाला जाणार असाल, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. 

Updated: Feb 13, 2017, 03:25 PM IST
अंगारकीनिमित्त सिद्धिविनायकाच्या मंदिरात सुरक्षेत वाढ title=

मुंबई : उद्या अंगारकीनिमित्त तुम्ही मुंबईतल्या सिद्धिविनायकाच्या दर्शनाला जाणार असाल, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. 

सुरक्षेच्या कारणांमुळे उद्या सिद्धिविनायक मंदिरात हार, फुलं, नारळ घेऊन जाता येणार नाही. तसंच प्रसादासाठी स्टील बॉक्स नेता येणार नाही, प्लॅस्टिकचाच बॉक्स न्यावा लागेल. 

अंगारकी संकष्टीनिमित्त मोठ्या प्रमाणात सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची गर्दी असते. यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडून नये यासाठी पोलीस आणि मंदिर प्रशासनानं सुरक्षेसाठी हा निर्णय घेतलाय. 

या निर्णयामुळे परिसरातले फूल-हार विक्रेते नाराज झालेत. तर भाविकांनी या निर्णयाचं स्वागत केलं.