मुंबई : बुधवारी आयएसआय एजंट अल्ताफ कुरैशीला अटक केल्यानंतर आणखी एका आयएसआय एजंटला मुंबईतून अटक करण्यात आलीय.
आयएसआयचा आणखी एक आयएसआय एजंटला मुंबईतून अटक करण्यात आलीय. मुंबईतील आग्रीपाडा भागातून जावेदला अटक केली असून जावेद हा आयएसआय या गुप्तचर संस्थेच्या थेट संपर्कात होता आणि त्यालाच पाकिस्तानहून आफताब अलीला हेरगिरी करण्याचे पैसे देण्याचे आदेश मिळाले होते.
जावेदच्या सांगण्यावरून आग्रीपाड्यातीलच अल्ताफ कुरैशिने फैजाबादचा आयएसआय एजंट आफताबला पैसे पाठवल्याचे ठोस पुरावे देखील एटीएसला मिळालेत.
अल्ताफ कुरेशी आणि जावेदला थोड्याच वेळात मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. उत्तर प्रदेश एटीएसने महाराष्ट्र एटीएसच्या मदतीने ही कारवाई केलीय. सलग दुसऱ्या दिवशी मुंबईतून आयएसआय एजंटच्या अटकेने मोठी खळबळ उडालीय.