रात्री ११.२० वाजता
शिवसेनेचा प्रस्ताव मान्य नाही, नवा प्रस्ताव दिलाय - देवेंद्र फडणवीस
- भाजपचा नवा प्रस्ताव शिवसेनेकडे दिला आहे. उद्धव ठाकरे योग्य तो निर्णय घेतील - फडणवीस
- मागच्यावेळी जेवढ्या जागा लढविल्या त्यापेक्षा कमी जागा आहेत
-मित्र पक्षांना जागा दिल्यानंतर आमच्या जागा कमी होतात.
- भाजपने प्रस्ताव दिला होता. काही जागांबद्दलचा प्रस्ताव दिला होता.
- आम्ही उचीत प्रस्ताव मांडला आहे.
- आमचा जास्त जागांता प्रस्ताव होता. त्यापेक्षा जागा कमी आहेत.
रात्री ११.०० वाजता
शिवसेनेच्या नव्या प्रस्तावावर मातोश्रीवर चर्चा सुरु
देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा
रात्री १०.३० वाजता
देवेंद्र फडणवीस मातोश्रीवर दाखल
देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर
शिवसेना-भाजप युतीबाबत चर्चा करणार
रात्री ८.३५ वाजता
महायुतीचा निर्णय मीच घेणार - ओमप्रकाश माथूर
केंद्रीय संसदीय समितीत जागा वाटपाचा प्रस्ताव ठेवणार
देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा होणार
सायंकाळी ५.३० वाजता
* शिवसेनेच्या नव्या फॉर्म्युल्यावर चर्चा होणार - विनोद तावडे
* देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार
* सेनेच्या नव्या फॉर्म्युल्यावर चर्चा होईल - भाजप
* सुभाष देसाई यांनी सेनेचा फॉर्म्युला भाजपसमोर ठेवला
नवा फॉर्म्युला
* शिवसेना - १५५ जागा
* भाजप - १२६
* स्वाभिमानी - ७
दुपारी ३.०० वाजता
* पूनम महाजन यांच्या घरी झाली सेना-भाजप नेत्यांची चर्चा आणि बैठक
* शिवसेनेच्या नव्या फॉर्म्युल्यावर भाजप विचार करून निर्णय घेणार.
* शिवसेना नेते सुभाष देसाई, अनिल देसाई यांनी घेतली भाजप नेत्यांची भेट
* ओम माथूर, देवेंद्र फडणवीस यांना भेटले शिवसेना नेते
* जानकर, मेटेंना विधान परिषदे आमदारकीचं युतीकडून आश्वासन
* भाजपनं प्रस्ताव स्वीकारल्यास अदलाबदल शक्य
शनिवारी दुपारी २.३० वाजेपर्यंत...
मुंबई : जागावाटपा संदर्भात शिवसेनेनं भाजपसमोर नवा फॉर्म्युला मांडलाय. यामध्ये, भाजपला ७ जागा सोडण्याची तयारी शिवसेनेनं दाखवलीय. मात्र, अद्याप सेनेकडून कुठलाही प्रस्ताव आलेला नाही, असं भाजपचे प्रभारी ओ. पी. माथून यांनी म्हटलंय.
एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी आज सकाळपासूनच अनेक नेते दाखल होत आहेत. साहजिकच राजकारणानं वेग घेतलाय.
शिवसेनेचा नवा फॉर्म्युला
शिवसेना १५५ जागा लढवणार... भाजपकडे १२४ जागा, रिपाई - २ जागा तर शिवसेना स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी ७ जागा सोडण्यास तयार झालीय... आणि हाच नवीन फॉर्म्युला असल्याचं समजतंय.
आता, दुपारी ३.०० वाजता पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी महायुतीचे नेते बैठकीसाठी बसणार आहेत.
आजची चर्चा सकारात्मक पद्धतीनं सुरू असल्याचं या बैठकीला उपस्थित असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी म्हटलंय.
शुक्रवारचा दिवस सेना-भाजप युतीच्या संभ्रमाचा...
‘झी २४ तास’च्या एका महत्त्वाच्या बातमीने शुक्रवारी संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली. विषय होता महायुती संपुष्टात आल्याची...
शिवसेना भाजपमध्ये जागावाटपावरुन अजूनही एकमत झालेलं नाही. शुक्रवारी सकाळपासून सुरु झालेलं नाट्य रात्री उशिरा दोन वाजेपर्यंत सुरु होतं. रात्री उशिरापर्यंत एकनाथ खडसेंच्या घरी भाजप निवडणूक समितीची बैठक सुरू होती.
भाजपचा शिवसेनेसमोर नवा फॉर्म्युला...
भाजप - १२५
शिवसेना - १४५
मिक्षपक्षांना - १८ जागा
अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय.
रात्री विनोद तावडे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. यावेळी शिवसेनेकडून प्रस्ताव मिळाल्याची माहिती तावडे यांनी दिली. आता या प्रस्तावावर भाजपची कोअर कमिटी निर्णय घेणार आहे. भाजपच्या कोअर कमिटीची बैठक आज सकाळी होणार आहे. याच बैठकीत शिवसेना-भाजपमध्ये कोणत्या प्रस्तावावर एकमत होतं हे स्पष्ट होईल.
पण, यामुळे शिवसेना-भाजप युतीमध्ये आलबेल नसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. युती संपुष्टात येणार असल्याचं वृत्त ‘झी २४ तास’नं शुक्रवारी सकाळी दिलं. त्यावरून दिवसभर चर्चांना आणि महायुतीच्या बैठकांना वेग आला.
मात्र, दिवस संपत आला तरी जागावाटपाबाबत अजूनही तोडगा निघू शकला नाही. जागावाटपाचा चेंडू एकमेकांच्या कोर्टात ढकलण्याची स्पर्धा सुरू झालीय. दोन्ही बाजू आपापल्या प्रस्तावावर ठाम असल्यानं जागावाटपाचं घोडं अडलेलंच आहे. जागावाटपाचा प्रस्ताव शिवसेनेकडं पाठवल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. तर आमच्या प्रस्तावावर भाजपला काय तो निर्णय घ्यायचाय, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे. शुकवारी रात्री उशिरा उद्धव ठाकरे आणि भाजपचे निवडणूक प्रभारी ओ. पी. माथूर यांच्यात बैठक होणार असल्याचं सांगितलं जात होतं. उद्धव ठाकरेंनी मात्र अशाप्रकारची कोणतीही बैठक होणार नसल्याचं स्पष्ट केलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.