जाब विचारायला गेल्यावर पालकांना शाळेने कोंडले

 मुंबईतल्या विक्रोळीतील अभय इंटरनॅशनल स्कूलनं अभ्य़ासक्रमाबद्दल जाब विचारायला गेलेल्या पालकांना कोंडून ठेवल्याचा अजब आणि संतापजनक प्रकार घडलाय. 

Updated: Jun 14, 2016, 06:40 PM IST
जाब विचारायला गेल्यावर पालकांना शाळेने कोंडले  title=

मुंबई :  मुंबईतल्या विक्रोळीतील अभय इंटरनॅशनल स्कूलनं अभ्य़ासक्रमाबद्दल जाब विचारायला गेलेल्या पालकांना कोंडून ठेवल्याचा अजब आणि संतापजनक प्रकार घडलाय. 

एवढंच नव्हे तर या बातमीचं वृत्तांकन करायला गेलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींनाही शाळेत कोंडून ठेवण्यात आलं होतं. 

या प्रकाराची माहिती  मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर शाळेनं सर्वांना सोडून दिलं. 

मात्र शाळेनं केलेल्या या संतापजनक प्रकाराची गंभीर दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी पालकांनी केलीय.