...तर स्नेहभोजन मातोश्रीवरच होईल - राऊत

उद्धव ठाकरेंच्या दिल्ली भेटीविषयी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सूचक विधान केलंय.

Updated: Mar 27, 2017, 10:59 AM IST
...तर स्नेहभोजन मातोश्रीवरच होईल - राऊत  title=

मुंबई : उद्धव ठाकरेंच्या दिल्ली भेटीविषयी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सूचक विधान केलंय.

राष्ट्रपतीपदासाठी पाठिंबा मागण्यासाठी जर स्नेहभोजन होणार असेल तर ते मातोश्रीवर होईल, असा ठाम पवित्रा शिवसेनेनं घेतलाय. यापूर्वी राष्ट्रपतीपदासाठी पाठिंब्याची चर्चा मातोश्रीवरच झाली... त्यामुळे यावेळीही ती चर्चा मातोश्रीवरच होईल... असं स्पष्टीकरण यावेळी संजय राऊत यांनी दिलंय.  

चालू आठवड्यात दिल्लीत मोदींच्या उपस्थितीत एनडीएची बैठक होणार असून त्यासाठी उद्धव ठाकरेंना भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी दिल्लीत येण्याचं निमंत्रण दिलं आहे. त्या पार्श्वभूमीवर राऊतांचं हे विधान महत्वाचं मानलं जातंय.