राष्ट्रवादीचा काँग्रेसला `संदेश`!

राष्ट्रवादीचे कणकवलीचे माजी नगराध्यक्ष आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कार्याध्यक्ष संदेश पारकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. नारायण राणे आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 2, 2013, 09:34 PM IST

www.24taas.com, मुंबई
राष्ट्रवादीचे कणकवलीचे माजी नगराध्यक्ष आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कार्याध्यक्ष संदेश पारकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. नारायण राणे आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला.
संदेश पारकर एकेकाळी नारायण राणेंचे राष्ट्रवादीतले कट्टर प्रतिस्पर्धी मानले जायचे. मात्र आता त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. राणे शिवसेनेमध्ये असतांना संदेश पारकर यांनी राणेंना शह दिला होता.
सध्या एनसीपीचे आमदार दीपक केसरकर आणि संदेश पारकर यांच्यात अंतर्गत वाद असल्यामुळे, पारकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचं बोललं जातंय. संदेश पारकर यांच्या काँग्रेसप्रवेशामुळे राष्ट्रवादीला खिंडार पडण्याची शक्यता आहे.