डॉ. दाभोलकरांच्या हत्येने `सनातन`ला `धक्का`!

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येमुळं सनातन संस्था या हिंदुत्ववादी संघटनेलाही `धक्का` बसलाय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 20, 2013, 07:11 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येमुळं सनातन संस्था या हिंदुत्ववादी संघटनेलाही `धक्का` बसलाय. डॉ. दाभोलकरांची झालेली हत्या घटना जितकी धक्कादायक आहे, तितकंच त्यासाठी सनातन संस्थेला दोषी ठरवणं धक्कादायक आहे, अशी प्रतिक्रिया सनातनचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी व्यक्त केलीय.
‘दाभोळकरांना असलेला विरोध व्यक्ती म्हणून नव्हे, तर त्यांच्या धर्मविरोधी विचारांना होता. सनातन संस्थेने आजपर्यंत दाभोलकरांची उपेक्षा केली. यात सनातनचा कुठलाही वैरभाव नव्हता. डॉ. दाभोलकरांची हत्या ही निश्चितच धक्कादायक घटना आहे. मात्र त्यासाठी सनातन संस्थेला दोषी ठरवणं आणखी धक्कादायक आहे. सनातन संस्थेने लोकशाही मार्गांनी दाभोलकर यांच्या निरीश्वरवादी विचारांचा विरोध केला. निरीश्वरवादाचे प्रतिनिधी म्हणून दाभोलकरांना आपचा विरोध होता’ असं अभय वर्तकांनी स्पष्ट केलं.
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येमागे एखाद्या हिंदुत्ववादी संघटनांचा हात असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. सनातन या संस्थेवर थेट आरोप करत काँग्रेस आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.