गुरूदास कामत यांचा भाचा समीर देसाई भाजपमध्ये दाखल

 मुंबईतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार गुरूदास कामत यांचा भाचा समीर देसाई यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप आमदार आशिष शेलार आणि राज्यमंत्री विद्या ठाकूर यांच्या उपस्थितीत देसाई यांनी प्रवेश केला, समीर देसाई हे काँग्रेसचे नगरसेवक देखिल होते.

Updated: Nov 16, 2014, 09:31 PM IST
गुरूदास कामत यांचा भाचा समीर देसाई भाजपमध्ये दाखल title=

मुंबई:  मुंबईतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार गुरूदास कामत यांचा भाचा समीर देसाई यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप आमदार आशिष शेलार आणि राज्यमंत्री विद्या ठाकूर यांच्या उपस्थितीत देसाई यांनी प्रवेश केला, समीर देसाई हे काँग्रेसचे नगरसेवक देखिल होते.
 
देसाई यांनी काँग्रेसमध्ये अनेक वर्ष काम करूनही योग्य न्याय मिळाला नसल्याची खंत व्यक्त केली आहे. याशिवाय भाजपमध्ये प्रवेश करताच त्यांची भाजपच्या मुंबई प्रदेश सचिवपदी वर्णी लागली असल्याचं सांगण्याच येत आहगे. देसाई यांच्या भाजप प्रवेशामागे मुंबई महापालिकेच्या निवडणुकांची पार्श्वभूमी असल्याचीही चर्चा आहे.
 
मुंबई महानगरपालिका स्वबळावर जिंकण्याची तयारी भाजपने सुरु केली आहे, याचे हे संकेत असल्याचं सांगण्यात येतंय. याचाच एक भाग म्हणजे इतर पक्षातून मुंबईतले अनेक महत्वाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना भाजपने आपल्याकडे खेचण्यास सुरूवात केली असल्याची चर्चा आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.