मुस्लिमांना येथे राहायचे असेल तर देशाचा आदर ठेवा : सलीम खान

असहिष्णूता आणि त्यावरुन देशातील बिघडत असलेल्या वातावरणाबाबत अभिनेता सलमान खानचे वडील लेखक सलीम खान यांनी मुस्लिमांना फटकारलेय. तुम्हाला इथे राहायचे असेल तर देशाचा आदर करायला शिका, असे फटकारले. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी जातीयवादी नाहीत, असे म्हटले.

Updated: Nov 6, 2015, 04:54 PM IST
मुस्लिमांना येथे राहायचे असेल तर देशाचा आदर ठेवा : सलीम खान title=

मुंबई : असहिष्णूता आणि त्यावरुन देशातील बिघडत असलेल्या वातावरणाबाबत अभिनेता सलमान खानचे वडील लेखक सलीम खान यांनी मुस्लिमांना फटकारलेय. तुम्हाला इथे राहायचे असेल तर देशाचा आदर करायला शिका, असे फटकारले. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी जातीयवादी नाहीत, असे म्हटले.

मुस्लिमांना राहम्यासाठी भारत देश अधिक सुरक्षित आहे. जगात अन्य देशांच्या तुलनेत भारत चांगला  देश आहे. भारतापेक्षा चांगला दुसरा देश मुसलमानांना राहण्यासाठी नाही. मुस्लिमांना देशात राहायचे असेल तर देश आणि त्याची संस्कृती जपली पाहिजे. तिचा आदर केला पाहिजे. पंतप्रधान मोदी कधीही जातीय होऊ शकत नाहीत. ते नेहमी 'सबका साथ - सबका विकास', असा विश्वास देतात. भारतात राहणारे मुसलमान पाकिस्तान, इराक, इराण किंवा अफगाणिस्तानात जाऊन राहणे पसंत करतील का, असा सवाल सलीम खान यांनी उपस्थित केला.

साहित्यिक, लेखक, कलावंत यांच्याकडून वाढत्या असहिष्णूतेविरोधात पुरस्कार 'वापसी' करण्यात येत आहे. त्याबाबद सलीम खान म्हणालेत, सरकारने असहिष्णूता विषयावर काम करण्याची गरज आहे. याबात कोणीतरी विचार करण्याची गरज आहे की, काहीतरी समस्या आहे. त्यामुळे आपआपसात चर्चा करण्याची गरज आहे.  दरम्यान, FTTI मुद्द्यावर सलीम खान म्हणालेत, जर गजेंद्र चौहान यांच्याजवळ आत्म सम्मान असेल तर त्यांनी तात्काळ राजीनामा देण्याची गरज आहे. त्यांच्यासोबत काम करणाऱ्या लोकांना त्यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.