मुंबई : येत्या २३ तारखेला महापालिकेवर भगवा भडकणारच, शिवसेना महापालिका पुन्हा काबीज करेल, पण त्या दिवशी एक दुःख असेल की या विजयोत्सवात रत्नागिरीजवळ झालेल्या अपघातात मृत्यूमुखी पडलेले ते माझे ७ शिवसैनिक नसतील, अशा शद्बांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना भरसभेत बोलून दाखविल्या...
७ फेब्रुवारी रोजी रत्नागिरीजवळ झालेल्या अपघातात मुंबईतील ७ तरूणांचा मृत्यू झाला होता. या घटनेची आठवण उद्धव ठाकरे यांनी परळच्या सभेत करून दिली. उद्धव ठाकरे यांनी आज पार्ल्यातील या शिवसैनिकांच्या घरी भेट दिली. त्यावेळी त्यांनी त्यांच्या मित्रांना सांगितले शिवसेना प्रमुख सांगायचे रात्री दहा वाजेपासून सकाळी सातवाजेपर्यंत कुठेही प्रवास करू नका.... मी इथे सर्वांना तेच सांगतो.. रात्रीचा प्रवास करू नका...
आजही माझ्या डोळ्यासमोरील दृश्य हालत नाही आहेत. २३ तारखेला आपण जिंकणारच पण ती मुलं नसतील याचं मला दुःख आहे. ते आज कुठून ना कुठून काम करत असतील ते शिवसेनेसाठी याची मला खात्री आहे...
शिवसेनेवर जिवापाड प्रेम करणारे शिवसैनिक आहेत, म्हणून मी आहे असे उद्धव ठाकरे आणि बोलून दाखविले....