पर्यटकांची फसवणूक करणाऱ्या सचिन जकातदारला अटक

मुंबईतल्या शिवाजी पार्क पोलिसांनी सचिन ट्रॅव्हल्सचे मालक सचिन जकातदार याला फसवणुकीच्या गुन्ह्याखाली अटक केलीय. परदेशी पाठवतो, असं सांगून अनेक लोकांकडून लाखो रुपये उकळल्याच्या आरोपाखाली सचिन जकातदारला अटक करण्यात आलीय. 

Updated: Apr 2, 2015, 10:07 AM IST
पर्यटकांची फसवणूक करणाऱ्या सचिन जकातदारला अटक title=

मुंबई: मुंबईतल्या शिवाजी पार्क पोलिसांनी सचिन ट्रॅव्हल्सचे मालक सचिन जकातदार याला फसवणुकीच्या गुन्ह्याखाली अटक केलीय. परदेशी पाठवतो, असं सांगून अनेक लोकांकडून लाखो रुपये उकळल्याच्या आरोपाखाली सचिन जकातदारला अटक करण्यात आलीय. 

न्यायालायनं त्याला ६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावलीय. सचिन जकातदार विरोधात तब्बल ८४ लोकांनी फसवणुकीच्या तक्रारी दाखल केल्या होत्या. यात ८६ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका सचिन जकातदारवर ठेवण्यात आलाय. 

इतरही कोणी अशाप्रकारे फसवले गेले आहेत का? याचा तपास पोलीस करत आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.