ड्रग्ज आणि बाला... पोलीसही पागल झाला!

मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यातला कॉन्स्टेबल धर्मराज काळोखेकडून सातारा पोलिसांना एमडी या घातक अंमली पदार्थाचा तब्बल ११० किलो साठा सापडला. मात्र या प्रकरणात एक वेगळा ट्वीस्ट निर्माण झालाय. यात धर्मराज काळोखेच्या प्रेयसीची भूमिका असल्याचं समोर येतंय. हे दोघे गेल्या १५ वर्षांपासून अंमली पदार्थांची तस्करी करत होते. 

Updated: Mar 13, 2015, 12:45 PM IST
ड्रग्ज आणि बाला... पोलीसही पागल झाला! title=

मुंबई : मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यातला कॉन्स्टेबल धर्मराज काळोखेकडून सातारा पोलिसांना एमडी या घातक अंमली पदार्थाचा तब्बल ११० किलो साठा सापडला. मात्र या प्रकरणात एक वेगळा ट्वीस्ट निर्माण झालाय. यात धर्मराज काळोखेच्या प्रेयसीची भूमिका असल्याचं समोर येतंय. हे दोघे गेल्या १५ वर्षांपासून अंमली पदार्थांची तस्करी करत होते. 

मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यातला पोलीस कॉन्स्टेबल धर्मराज काळोखेच्या गावातल्या घरात  ११० किलो एमडी ड्रगचा साठा सापडला. तसंच त्याच्या पोलीस ठाण्यातल्या कपाटात १२ किलो एमडी ड्रग सापडल्याने पोलीस दलात खळबळ माजलीय. पण या प्रकरणातला आरोपी कॉन्स्टेबल असलेला हा धर्मराज काळोखे अंमली पदार्थांचा तस्कर कसा बनला याची पोलीस दलात जोरदार चर्चा रंगलीय.  

धर्मराज काळोखे हा वरळी इथे कामाला असताना जिजामात झोपडपट्टीत अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या बेबी पेडणेकर या महिलेशी त्याची ओळख झाली. त्या ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. धर्मराज तिला या तस्करीच्या धंद्यात मदत करू लागला. तस्करीच्या निमित्ताने हे दोघे अनेकदा राज्याबाहेर जायचे. हा गोरखधंदा गेल्या १५ वर्षांपासून सुरू होता. नुकतेच ते तस्करीच्या निमित्ताने गोव्याला गेले होते. मात्र, त्यांचा हा गेम फसला आणि पोलिसांना त्यांच्या या अंमली पदार्थांच्या तस्करीची टीप पोलिसांना मिळाली. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धर्मराज आणि त्याची ही प्रेयसी यांच्यासोबतच एक मोठ्या ट्रॅव्हल कंपनीचा मालक आणि एक वरीष्ठ पोलीस अधिकारी यांचेही हात या गोरखधंद्यात माखले आहेत. यावरूनही लवकरच पडदा उठेल असं पोलिसांनी म्हटलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.