मुंबई : काँग्रेसचे दिग्गज नेते, माजी मुख्यमंत्री आणि माजी महसूल मंत्री नारायण राणे यांचा वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत पराभव झाला. या पराभवाची चर्चा जिंकलेल्या उमेदवारापेक्षा जास्त होती.
सोशल मीडियावरही या चर्चेला उधाण आलं होतं. सोशल मीडियावर "नारायण राणेंना आजच्या पराभवा पेक्षा, उद्याच्या #सामना च्या हेडलाईन ची जास्त चिंता असेल." हा मेसेज सर्वात जास्त व्हायरल होत होता.
#सामना या दैनिकाची हेडलाईन काय?
यावरून शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना या दैनिकाची हेडलाईन काय असेल, याची उत्सुकता सर्वांना लागून होती. सामनाने काय हेडलाईन केली आहे, हे आपण फोटोत पाहू शकता, मात्र नारायण राणे यांचं समजलं जाणार प्रहार या दैनिकाची हेडलाईन काय असेल याकडेही सर्वांचं लक्ष होतं.
#प्रहार या दैनिकाची हेडलाईन काय?
मात्र प्रहारने अगदी साधेपणाने हेडलाईन दिली आहे. मात्र प्रहारच्या या संपूर्ण बातमीत नारायण राणे हे पराभूत झाले असा उच्चार करण्यात आलेला नाही, हे विशेष. या बदल्यात नारायण राणे यांना किती मतं पडली, असा तपशील देण्यात आला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.