महायुती नाट्यावर आबांची खोडी, शिवसेनेला सहानुभूती

 महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते आर. आर. पाटील यांनी महायुतीतील नाट्यात शिवसेनेबद्दल सहानुभूती दर्शवून खोड़ी काढली आहे. झी २४ तासवरील रोखठोक आबा या कार्यक्रमात ते बोलत होते.  महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते आर. आर. पाटील यांनी महायुतीतील नाट्यात शिवसेनेबद्दल सहानुभूती दर्शवून खोड़ी काढली आहे. झी २४ तासवरील रोखठोक आबा या कार्यक्रमात ते बोलत होते. 

Updated: Sep 19, 2014, 04:22 PM IST
महायुती नाट्यावर आबांची खोडी, शिवसेनेला सहानुभूती title=

मुंबई :  महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते आर. आर. पाटील यांनी महायुतीतील नाट्यात शिवसेनेबद्दल सहानुभूती दर्शवून खोड़ी काढली आहे. झी २४ तासवरील रोखठोक आबा या कार्यक्रमात ते बोलत होते.  महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते आर. आर. पाटील यांनी महायुतीतील नाट्यात शिवसेनेबद्दल सहानुभूती दर्शवून खोड़ी काढली आहे. झी २४ तासवरील रोखठोक आबा या कार्यक्रमात ते बोलत होते. 

यावेळी ते म्हणाले, भाजप शिवसेनेमध्ये जो बे-बनाव सुरू आहे तो केवळ जागा वाटपाचे भांडण आहे असे मला वाटत नाही. केंद्रात १८ खासदार निवडून आल्यानंतरही शिवसेनेला भाजपाने जी वागणूक दिली, म्हणजे मागितलेले चांगले मंत्रीपद दिले नाही. जे मंत्रीपद महाराष्ट्रासाठी राखीव आहे ते भाजपने शिवसेनेला दिले. त्यामुळे इथेच कुठेतरी शिवसेनेच्या भावना दुखावल्या असल्याचे आबांनी सांगितले. 

दुसरीकडे देशपातळीवर कुठेतरी एक मोठा विजय मिळाल्यावर भाजपचे लोक अर्धा हळकुंडाने पिवळे झाले आहेत. त्यामुळे डझनभर लोकांनी मुख्यमंत्रीपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. १८ खासदार निवडून एक गीते शिवसेनेला मंत्री म्हणून मिळाले. भाजपने वाढीव जागा घेतल्या तर महाराष्ट्रात ओळीने गीते उभे करण्याचा दुसरा पर्याय भाजपचे लोक शिवसेनेसमोर ठेवतील असे मला वाटत नाही. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.