मुंबई : भविष्य निर्वाह निधी विभागा अंतर्गत सध्या कामगार नोंदणी अभियान सुरू करण्यात आलंय. जे कामगार अजूनही भविष्य निर्वाह निधी योजनेपासून वंचित आहेत, अशा कामगारांना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी ही मोहीम आखण्यात आली आहे, त्यात उद्योजकांनाही काही सूट देण्यात आली आहे.
एप्रिल 2009 ते डिसेंबर 2016 या कालावधीत ज्या कामगारांची भविष्य निर्वाह निधीचे सदस्य म्हणून नोंदणी केली नव्हती, अशा मासिक 15 हजार रुपये पर्यंत पगार असलेल्या कामगारांची या योजनेसाठी नोंदणी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
या मोहिमेमुळे कामगारांना भविष्य निर्वाह निधीनुसार अस्तित्वात असलेले पेन्शनसह सर्व फायदे मिळणार आहेत. 1 जानेवारी पासून सुरु झालेली मोहिम 31 मार्च पर्यंत चालणार आहे.