मानखुर्द येथे तेल गोदामाला भीषण आग

मानखुर्द येथील मंडाला विभागात असलेल्या गोदामांना भीषण आग लागली आहे. आग विझविण्यासाठी घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या 12 गाड्या दाखल झाल्यात. ही आग संध्याकाळी सव्वा सहाच्या सुमारास लागली.

Updated: Jan 12, 2017, 08:19 PM IST
मानखुर्द येथे तेल गोदामाला भीषण आग title=

मुंबई : मानखुर्द येथील मंडाला विभागात असलेल्या गोदामांना भीषण आग लागली आहे. आग विझविण्यासाठी घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या 12 गाड्या दाखल झाल्यात. ही आग संध्याकाळी सव्वा सहाच्या सुमारास लागली.

कुर्ला स्क्रॅप असोसिएशनमध्ये तेलाचे गोदाम असून या गोदामाला सुरुवातीला आग लागली. त्यानंतर ही आग बाजूला असलेल्या रद्दीच्या गोदामाला लागली. त्यामुळे आगीचा भडका उडला. अनेकांची पळापळ झाली.

दरम्यान, आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्यात. भडकलेली आग विझविण्याचे प्रयत्न सुरु होते. ज्या परिसरात आग लागली आहे. त्या परिसराच्या बाजूला झोपडपट्टी असल्यामुळे आगीची भीती व्यक्त करण्यात येत आहे.