मुंबई : मुंबईतल्या वरळी भागातील जिजाजामाता नगर भागातील प्रकल्पग्रस्तांच्या चाळी पाडण्याचा घाट घालण्यात आलाय. यासाठी मनपा अधिकारी आणि बिल्डरांचं साटलोटं असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केलाय.
जिजामाता नगर परिसरात प्रकल्पबाधित लोकांसाठी या चाळी बांधण्यात आल्या होत्या. मात्र, मनपा दरबारी आता त्यांचा समावेश झोपडपट्टी म्हणून करण्यात आलाय. यासाठी नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोपही करण्यात येतोय.
विशेष म्हणजे, या चाळींच्या पुनर्विकासासाठी कुठलीही निविदा न काढता थेट एका बिल्डरला हे कंत्राट देण्यात आल्याचा दावा स्थानिक करतायत.
तत्कालीन पालिका आयुक्त सुबोधकुमार यांनी जिजामाता नगरला झोपडपट्टी दर्जा देता येत नसल्याचा शेरा स्पष्टपणे दिला होता. मात्र, तरीही आता या चाळी पाडण्याचा घाट आता नव्यानं घातला जातोय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.