रेल्वेत १२ हजार पोलिसांची भरती

रेल्वे सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. आता रेल्वेची सुरक्षा कडक करण्यासाठी नव्याने रेल्वे सुरक्षा बळ विभागात १२,००० पोलिसांची भरती केली जाणार आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 2, 2013, 08:53 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
अनेकवेळा रेल्वेची सुरक्षा धोक्यात असल्याची बोंब मारण्यात येते. कारण रेल्वेत छेडछानी, चोरी तसेच लुटण्याचे प्रकार घडले आहेत. तरीही रेल्वे सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. आता रेल्वेची सुरक्षा कडक करण्यासाठी नव्याने रेल्वे सुरक्षा बळ विभागात १२,००० पोलिसांची भरती केली जाणार आहे.
रेल्वेची सुरक्षा रेल्वे पोलीस फोर्स (आरपीएफ) तसेच गर्व्हमेन्ट रेल्वे पोलीस (जीआरपी) या दोन रेल्वे पोलीस विभागांवर असते. असे असताना रेल्वेतील वाढत्या घटनांमुळे हे दोन्ही विभाग झोपा काढतात काय, असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात येत होता. या दोन्ही विभागांच्या मदतीला लवकरच रेल्वेचे आरपीएफ जवान असतील. भारतीय रेल्वेत तब्बल १२ हजार जवानांची भरती केली आहे. तशी प्रक्रिया सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

जीआरपीने जादा मुनष्यबळाची मदत मागितली आहे. त्यांना १०० पोलिसांची मंजुरी महाराष्ट्र राज्य सरकारकडून मिळाली आहे. रेल्वेने त्याचा निम्मा खर्च उचलण्याबाबतचा प्रश्न सध्या न्यायालयात आहे. तरीही जादा मनुष्यबळ मिळावे म्हणून जीआरपी रेल्वे बोर्ड आणि राज्य सरकारच्या संपर्कात आहे. तर राज्य सरकारने होमगार्डची मदत देण्यास सहमती दर्शविली आहे.
भारतीय रेल्वेते १२ हजार आरपीएफ जवानांची भरती करण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे. या १२ हजारपैकी काही जवान पश्चिदम आणि मध्य रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मिळणार आहेत. मात्र, या भरतीचा नक्की काय कालावधी आहे, हे सांगण्यात आले नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.