मुंबई : ऐन दिवाळीतच राज्य वीज नियामक आयोगानं मुंबईतल्या बेस्टच्या वीज ग्राहकांना दर कपातीची भेट दिली आहे. बेस्टचे वीज दर ७ टक्क्यांनी कमी करण्याचा आदेश वीज नियामक आयोगानं दिला आहे. ही नवीन वीज दररचना या ऑक्टोबर महिन्यापासूनच लागू होणार आहे. त्यामुळे आता ग्राहकांना प्रति युनिट ४ रुपये १३ पैशांऐवजी ३ रुपये ९२ पैसे या दराने वीजबिल येणार आहे.
आधीच आर्थिक संकटात असलेल्या बेस्टला मात्र यामुळे मोठा फटका बसला आहे. परिवहन विभागाच्या तूटीची वसूली करण्यासाठी वीज ग्राहकांकडून वसूल केलेल्या टीडीएलआरचे ३ हजार १९५ कोटी सुद्धा बेस्टला ग्राहकांना परत करावे लागणार आहेत.
मात्र सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम आदेश येईपर्यंत हे परतावे दिले जाणार नाहीत. एकंदरीत १०० युनिटपर्यंत वीज वापरणा-या सर्वच निवासी वीज ग्राहकांसाठी ही दिवाळीची भेटच ठरली आहे.