भांडुपमध्ये ४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार

भांडुपमधील तुलशेतपाड़ा परिसरात अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. 

Updated: May 25, 2015, 10:30 PM IST
भांडुपमध्ये ४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार title=

मुंबई : भांडुपमधील तुलशेतपाड़ा परिसरात अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. 

संध्याकाळच्या सुमारास जगन्नाथ जैसवाल या ५७ वर्षीय नाराधमाने शेजारी राहत असलेल्या ४ वर्षाच्या चिमुरडीला खाऊच आमिष दाखवून आपल्या घरात बोलावल आणि तिच्यावर अतिप्रसंग केला. 

संध्याकाळी आई वडील कामावरुन परतले असता तिच्या आईने मुलीची दयनीय अवस्था पाहता त्याला हटकलं आणि  हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. 

पालकांनी तड़क पोलिस ठाणे गाठून पोलिसांना ही माहिती दिली. रात्री उशीरा या आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलंय. 

दरम्यान मुलीची वैद्यकीय चाचणी करुन पोलिसांनी जगन्नाथ वर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.