मुंबई विमानतळाला मिळाला 'गोल्डन पिकॉक अॅवॉर्ड'

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल विमानतळाला बिजनेस एक्सलंससाठी 'गोल्डन पीकॉक अॅवॉर्ड'नं सन्मानित करण्यात आलं आहे. 

Updated: May 25, 2015, 04:51 PM IST
मुंबई विमानतळाला मिळाला 'गोल्डन पिकॉक अॅवॉर्ड' title=

मुंबई: मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल विमानतळाला बिजनेस एक्सलंससाठी 'गोल्डन पीकॉक अॅवॉर्ड'नं सन्मानित करण्यात आलं आहे. 

या अॅवॉर्डसाठी जगातील सर्व विमानतळांनी आपली दावेदारी सादर केली होती. मात्र दुसऱ्यांदा मुंबई विमानतळानं हा अॅवॉर्ड आपल्या नावे केला आहे. याआधी मुंबई विमानतळाला सस्टेनबिलिटीसाठी 'गोल्डन पीकॉक अॅवॉर्ड' मिळाला होता. 

प्रवाशांच्या सुविधा, अनेक नवीन सफल योजना यासाठी आजवर २८ अॅवॉर्ड मुंबई विमानतळानं मिळवले आहेत. मुंबई विमानतळ पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या अंतर्गत कार्यरत आहे. विश्वस्तरीत सुविधांच्यामुळे मुंबई विमानतळानं जगातील सर्व विमानतळांना मागे टाकलंय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.