दुसरीतल्या विद्यार्थीनीवर भर दुपारी शाळेतच बलात्काराचा प्रयत्न

मुली आणि महिला कुठंच सुरक्षित नाहीत हे सिद्ध करणारं आणखी एक उदाहरण म्हणजे मुंबईतल्या शाळेत घडलेली एक संतापजनक घटना. सायन येथिल एका शाळेत सात वर्षाच्या चिमुरडीवर बलात्काराचा  करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. विशेष म्हणजे शाळेतच्या सुरक्षा रक्षकानेच  हे घाणेरडं कृत्य केलंय.  

Updated: Sep 4, 2014, 08:36 PM IST
दुसरीतल्या  विद्यार्थीनीवर  भर दुपारी शाळेतच बलात्काराचा  प्रयत्न title=

मुंबई: मुली आणि महिला कुठंच सुरक्षित नाहीत हे सिद्ध करणारं आणखी एक उदाहरण म्हणजे मुंबईतल्या शाळेत घडलेली एक संतापजनक घटना. सायन येथिल एका शाळेत सात वर्षाच्या चिमुरडीवर बलात्काराचा  करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. विशेष म्हणजे शाळेतच्या सुरक्षा रक्षकानेच  हे घाणेरडं कृत्य केलंय.  

इंग्रजी माध्यमाची ही सीबीएम शाळा... ज्यूनिअर केजी ते दहावीपर्यंत  या ठिकाणी शिक्षण दिलं जातं. बुधवारी  नेहमीप्रमाणे  दुपारी 12 वाजता  शाळा सुटल्यावर दुसरीची एक विद्यार्थीनी  शाळेच्या याच गेटवर आईची वाट पाहत होती. 12 वाजून पाच मिनीटे झाली असता शाळेच्या याच सुरक्षा रक्षकानं चिमुरडीला  शाळेच्या मागे असलेल्या एका वर्गात नेलं आणि तिच्या  गुप्तागांवर  अत्याचार केले. इतकंच नाही तर याबाबत  कुणालाही  सांगायचं  नाही अशी धमकीही  दिली. विशेष म्हणजे हे सगळं घडत असताना  दुपारच्या  सत्राची शाळा सुरु होती. 

या प्रकरणी अँटॉप हिल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून पॉस्को  म्हणजेच प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन इन सेक्शुअल ऑफेन्स अक्ट अंतर्गत कारवाई  करण्यात  येणार आहे. सदर घटना ही सीसीटीव्ही  फूटेजमध्ये कैद झाल्यामुळं पोलिसांसाठी  हा मुख्य पुरावा असणार आहे. 

या घटनेनंतर सीबीएम शाळेनं जबाबदारी  स्वीकारत  सुरक्षा रक्षक मोहन मिश्रासहीत  त्याच्या  सुरक्षा एजन्सीचं कंत्राट  रद्द केलंय. तसंच ही दु:खद घटना घडल्यामुळं शाळेत उद्या शिक्षक दिवस साजरा केला जाणार नाहीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.