आठवलेंनी चारोळ्यांतून घातले 'शिवसेनेवर घाव'!

घाटकोपरच्या सोमय्या मैदानात झालेल्या भाजपच्या जाहीर प्रचारसभेत टाळ्या मिळवल्या आरपीआय नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या चारोळ्यांनी... 

Updated: Feb 18, 2017, 10:38 PM IST
आठवलेंनी चारोळ्यांतून घातले 'शिवसेनेवर घाव'! title=

मुंबई : घाटकोपरच्या सोमय्या मैदानात झालेल्या भाजपच्या जाहीर प्रचारसभेत टाळ्या मिळवल्या आरपीआय नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या चारोळ्यांनी... 

भाजपसोबत हातमिळवणी केलेल्या रामदास आठवले यांनी शिवसेनेवरही टीका करण्याची संधी यानिमित्तानं सोडली नाही. आपल्या कवितांतून त्यांनी शिवसेनेवर चांगलाच घावही घातला.

आठवलेंच्या चारोळ्या...

शिवसेना देत होती भाजपला जागा साठ,

पण त्यांनीच भाजपकडे फिरवली पाठ,

मग, देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर माझी पडली गाठ

बघा 21 तारखेला आम्ही लावतो शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीची वाट...

घालून शिवसेनेवर घाव,

आम्हीच जिंकणार मुंबई महापालिकेचा डाव,

देवेंद्र फडणवीस आहे तुमचा भाव,

रामदास आठवले आहे माझं नाव...

या सभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, खासदार मनोज तिवारी (दिल्ली भाजप अध्यक्ष) यांचीही उपस्थिती होती.